पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

उरुळी कांचन (जिल्हा पुणे) – कोयत्याचा धाक दाखवून आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीवर २ धर्मांधांनी मागील १५ दिवस वारंवार बलात्कार केला. येथील दत्तवाडी परिसरात १२ जुलै या दिवशी मुलीच्या आईने मुलीकडे विचारपूस केली असता वरील प्रकार पुढे आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी इरफान शेख (मुजावर) आणि आयुब शेख (मुजावर) यांच्यावर गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ १५ जुलै या दिवशी संपूर्ण उरुळी कांचन गाव बंद ठेवण्यात आले.
Pune Crime news : पुणे हादरलं! सख्ख्या भावांनी केला सलग 15 दिवस अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारhttps://t.co/voB230KcG2
— ABP माझा (@abpmajhatv) July 14, 2023
१. मुलीला कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी केला असला, तरी पोलिसांनी मात्र तक्रारीत तसा उल्लेख केला नाही, तसेच पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हिंदूंमध्ये संतापाची भावना आहे.
२. विशेष म्हणजे याच २ आरोपींवर काही दिवसांपूर्वी महापुरुषांच्या अवमानाच्या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. (समाजविघातक कारवाया करणार्या टोळीचा हे नराधम भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! – संपादक) भाजप उरुळी कांचन विभागाच्या वतीने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|
खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !
‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरसह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर ६० दिवस ड्रोनबंदी !
‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !