नवी देहली – आतंकवादी संघटना धर्माची प्रतिमा मलिन करण्याचे काम करतात, अशा शब्दांत ‘वर्ल्ड मुस्लिम लीग’चे प्रमुख महंमद बिन अब्दुल करीम अल्-ईसा यांनी आतंकवादी संघटनांवर टीका केली. ते सध्या ५ दिवसांच्या भारत दौर्यावर असून ‘धर्मांमधील सामंजस्यासाठी संवाद’ या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी अल्-ईसा यांनी आतंकवादाला प्रोत्साहन देणार्या संघटनांवर टीका करत जगभरातील वाढता संघर्षाविषयी चिंता व्यक्त केली.
Muslim World League chief denounces terror organisations for “distorting image of religions”#MohammedbinAbdulkarimAlIssa #MuslimWorldLeague #India #TV9News pic.twitter.com/8XeCF9xKv8
— Tv9 Gujarati (@tv9gujarati) July 14, 2023
(म्हणे) ‘आतंकवादी संघटनांना धर्म किंवा देश नसतो !’
जगात मानवता, स्थिरता आणि शांतता यांसाठी धोका निर्माण करत असलेल्या ‘इसिस’, अल्-कायदा, तालिबान, बोको हराम यांसारख्या आतंकवादी संघटनांविषयी विचारले असता, अल्-ईसा म्हणाले, ‘‘या आतंकवादी संघटना मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत नाहीत, ते केवळ स्वतःच्या संघटनेपुरतेच मर्यादित आहेत. त्यांना कुठलाही धर्म किंवा देश नाही.’’ (एकीकडे अल्-ईसा हे आतंकवादी संघटना धर्माची प्रतिमा मलिन करत असल्याचे विधान करतात, तर दुसरीकडे आतंकवादी संघटनांना धर्म किंवा देश नसतो, असेही म्हणतात ! या परस्परविरोधी वक्तव्यांतून अल्-ईसा यांचा दुटप्पीपणा उघड होतो ! – संपादक)
(सौजन्य : Zee News)
संपादकीय भूमिकानुसते असे बोलून काय उपयोग ? आज जग इस्लामी आतंकवादामुळे त्रस्त असतांना मुसलमान धर्मगुरु आणि नेते यांनी कधी आतंकवाद्यांविरुद्ध एक तरी फतवा काढला आहे का ? ‘जिहादी आतंकवाद’ असा उच्चारही न करणार्यांचे जिहादला समर्थन आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय ? |