TMC Attack ED Team : तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर धाड घालण्यासाठी गेलेल्या ‘ईडी’च्या पथकावर आक्रमण !

सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

Kolkata Bhagavad Gita : कोलकाता येथे १ लाखाहून अधिक लोकांनी केले सामूहिक गीतापठण !

६० सहस्र महिलांनी एकत्रित केला शंखनाद !
कार्यक्रमामुळे झाला विश्‍वविक्रम !

Kalyan Banerjee Mimicry : (म्हणे) ‘मिमिक्री (नक्कल) करणे, हा माझा मूलभूत अधिकार असून मी ती सहस्रो वेळा करीन !

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा उपराष्ट्रपती जगदीन धनखड यांच्याविषयीचा उद्दामपणा कायम ! मात्र एका खासदाराने उपराष्ट्रपतींवर टीका म्हणून नक्कल करणे, ही कला नसून द्वेष आहे आणि त्यासाठी संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे !

कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अधिवक्त्याला अटक करण्याचा दिला आदेश !

न्यायालयाचा अवमान करण्याचा आरोप करत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी अधिवक्ता प्रोसेनजीत मुखर्जी यांना अटक करण्याचा आदेश दिला.

बलात्काराच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने मुलींना दिलेल्या सल्ल्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी !

माननीय सर्वोच्च न्यायालयाने यासह तरुण पिढीत नैतिक मूल्यांचे संवर्धन होण्यासाठीही समाजाचे दिशादर्शन करावे, असे जनतेला वाटते !

बकर्‍यांचा बळी देण्यावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार !

हिंदूंच्या परंपरांचा अनादर करण्यात धन्यता मानणार्‍या या स्वयंसेवी संघटनेने ईदच्या वेळी बकर्‍यांच्या कुर्बानीला कधी विरोध केला आहे का ?

खोटे किंवा सूड उगवण्यासाठी बलात्कारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पीडितेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय

बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले.

उद्योगपती मुकेश अंबानी बंगालमधील कालीघाट मंदिराचा जीर्णोद्धार करणार !

मुकेश अंबानी यांनी २१ नोव्हेंबर २०२३ या दिवशी कोलकाता येथे आयोजित ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समिट’ला संबोधित करतांना ही घोषणा केली.

Geeta Pathan Kolkata : २४ डिसेंबरला कोलकातामध्ये १ लाख भाविक करणार गीतापठण

‘गीतापठण धार्मिक सौहार्द बिघडवते’, असे म्हणणारी तृणमूल काँग्रेस जिहादी संघटना आहे का ? असाच प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या बंगालमधील हिंदूंना हे मान्य आहे का ?

Mamta Banerjee Cricket Orange Jersey : आता भारतीय क्रिकेट खेळाडू सरावाच्या वेळी भगवे कपडे घालतात !  

भगव्या रंगाविषयी काविळ झालेल्या ममता बॅनर्जीना ‘भगवा रंग हा अस्पृश्य रंग आहे’, असेच यांच्या बोलण्यावरून वाटते. हिंदू त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार, हेही तितकेच सत्य आहे !