Mithun Chakraborty Stone Pelting : बंगालमध्ये भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रचारफेरीवर दगडफेक : तृणमूल काँग्रेसवर आरोप !

कोलकाता – अभिनेते तथा भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांचा बंगालमधील मिदनापूर शहरात प्रचारफेरी चालू असतांना काही लोकांनी दगडफेक केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर मिदनापूर शहरात भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या प्रचारासाठी मिथुन चक्रवर्ती यांची प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

भाजपचा तृणमूल काँग्रेसवर आरोप

या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपने म्हटले आहे की, या दगडफेकीमागे तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा हात आहे. भाजपला वाढता पाठिंबा पाहून तृणमूल काँग्रेस घाबरली आहे. त्यामुळे अशा प्रकारे गुंडगिरीचा अवलंब करत आहे.