ममता बॅनर्जी सरकार ‘भारत सेवाश्रम संघा’चा आश्रम पाडणार असल्याने आश्रमाला संरक्षण द्यावे ! – महंतांची उच्च न्यायालयात मागणी

  • बंगालमध्ये आता धार्मिक संघटनांचे आश्रमही धोक्यात !

  • २४ मे या दिवशी साधू-संत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार !

कोलकाता – बंगालमधील ‘भारत सेवाश्रम संघा’चे प्रमुख कार्तिक महाराज उपाख्य स्वामी प्रदीप्तानंद यांनी आश्रमावर आक्रमण होण्याची भीती व्यक्त केली आहे. आमचा आश्रम पाडणार असल्याने आश्रमाला संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली. ते म्हणाले की, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका वक्तव्यानंतर बेलडांगा येथील ‘भारत सेवाश्रम संघा’चा आश्रम पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. याविरोधात ‘रामकृष्ण मिशन’ आणि ‘भारत सेवाश्रम संघ’ या दोन्ही संघटनांचे साधू-संन्यासी २४ मे या दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘रामकृष्ण मिशन’ आणि ‘भारत सेवाश्रम संघ’ यांच्यावर आरोप केले होते आणि या दोन्ही संघटनांचे काही साधू भाजपच्या इशार्‍यावर राजकारण करत असल्याचे वक्तव्य केले होते. या टिपणीविषयी कार्तिक महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी भिक्षूंना अपकीर्त केल्याचा आरोप करत क्षमा मागण्याची मागणी केली आहे.

‘रामकृष्ण मिशन’च्या आश्रमावर आक्रमण !

भाजपचे नेते अमित मालवीय

दुसरीकडे बंगालमधील भाजपचे नेते अमित मालवीय यांनी आरोप केला आहे की, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांच्या वक्तव्यानंतरच जलपाईगुडीमध्ये असलेल्या ‘रामकृष्ण मिशन’च्या आश्रमावर आक्रमण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आक्रमणाचा निषेध केला आहे.

आचार्य प्रणवानंद महाराज यांनी वर्ष १९१७ मध्ये ‘भारत सेवाश्रम संघा’ची स्थापना केली होती. ही संघटना गेली १०७ वर्षे लोकसेवेत कार्यरत आहे. आचार्य प्रणवानंद महाराज बाबा गंभीरनाथ यांचे शिष्य होते. आचार्य प्रणवानंद महाराज हे स्वातंत्र्य चळवळीतही सक्रीय होते. ‘भारत सेवाश्रम संघा’चे मुख्यालय राशबिहारी अव्हेन्यू, कोलकाता येथे आहे आणि जगभरात या संघटनेची ४६ केंद्रे आहेत.

संपादकीय भूमिका

साधू-संतांना रस्त्यावर उतरायला भाग पाडणार्‍या ममता बॅनर्जी सरकारला एक दिवस हिंदू रस्त्यावर आणल्याविना रहाणार नाहीत !