West Bengal Murder : बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची प्रथम गोळी झाडून आणि नंतर शिरच्छेद करून हत्या

  • आरोपींनी स्वतःसमवेत शिर नेले !

  • तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हत्या केल्याचा मृताच्या भावाचा आरोप

नादिया (बंगाल) – येथील चांदपूर गावामध्ये हफिफुल शेख या भाजपच्या कार्यकर्त्याची १ जून या दिवशी हत्या करण्यात आली. या दिवशी येथे लोकसभेसाठी मतदान चालू होते. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी ही हत्या केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. ही हत्या कासिम, सोहोज, नसीम, सोबुज, अली, बंडू आदींनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुंडांनी शेख याच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळीबार केला आणि नंतर त्याचा शिरच्छेद केला. नंतर ते त्याचे डोके समवेत घेऊन गेले. शेख याने काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पूर्वी तो माकपचा कार्यकर्ता होता.

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसवर बंदी का घालत नाही ?, असा प्रश्‍न आता देशातून विचारला गेला पाहिजे !