Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या निकालाच्या ६ मासांनंतर देशात मोठा राजकीय भूकंप होईल ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दक्षिण २४ परगणा (बंगाल) – तुमचे एक मत देशाची दिशा पालटू शकते. ४ जून या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर ६ मासांनी देशात एक मोठा राजकीय भूकंप होईल. घराणेशाहीचे राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित प्रचारसभेत केले.

पंतप्रधान मोदी यांनी कुणाच्या संदर्भात हे विधान केले, हे स्पष्ट झालेले नाही.