कोईम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आणखी एका आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्‍यांनी सांगितले की, इद्रिसने त्याच्या साथीदारांसह आक्रमण करण्याचा कट रचला होता.

मणीपूर हिंसाचारावरून सरन्‍यायाधिशांवर टीका करणार्‍या लेखकाला तमिळनाडू पोलिसांकडून अटक !

पोलिसांनी राजकीय विश्‍लेषक आणि लेखक बद्री शेषाद्री यांना ‘यू ट्युब’ वाहिनीवरील एका मुलाखतीमध्‍ये मणीपूरमधील हिंसाचारावरून  सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांच्‍यावर टीका केल्‍याच्‍या आरोपावरून अटक केली.

न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांच्याच प्रतिमा लावण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

मद्रास उच्च न्यायालयाने परिपत्रक प्रसारित करत सांगितले की, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी अन् संत तिरुवल्लुवर यांच्या प्रतिमा आणि पुतळेच लावले जावेत.

उत्सवांत भक्तीऐवजी शक्तीचे प्रदर्शन करणारी मंदिरे बंद केली पाहिजेत ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंची मंदिरे बंद करण्याविषयीचा निर्णय हिंदूंच्या धर्मगुरूंना आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे !

अपमानास्पद संदेश पुढे पाठवणाराही (फॉरवर्ड करणाराही) दोषीच ! – मद्रास उच्च न्यायालय

संदेश बनवतांना किंवा पुढे प्रसारित करतांना प्रत्येकाने सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. संदेश प्रसारित करतांना किंवा पुढे पाठवलेला (फॉरवर्ड केलेला) संदेश हा कायमचा पुरावा बनतो. यामुळे होणारी हानी भरून काढणे जवळजवळ अशक्य आहे.

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला तमिळनाडूत अटक !

आतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कारवाई होत नसल्यामुळेच त्यांचे मनोबल वाढते आणि ते वारंवार विध्वंसक कृत्ये करू धजावतात !

चेन्नईमध्ये (तमिळनाडू) गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

अरुम्बक्कम, चेन्नई येथील डी.जी. वैष्णव महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तूत करीत आहोत.

(म्हणे) ‘सकाळी दारु पिणार्‍यांविषयी वाईट बोलू नये !’ – मंत्री मुथुसामी

मंत्रीच असे बोलत असतील, तर तमिळनाडूमध्ये नैतिकता शिल्लक राहील का ? याचा लहान मुलांवर काय परिणाम होईल ?, याचा तरी ते विचार करतील का ?

 तरुणीच्या कमरेवर हात ठेवून नृत्य करणार्‍या पाद्रयाचा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणाला अटक

पाद्रयांचे खरे स्वरूप विदेशातील जनतेला ठाऊक झाल्यामुळेच तेथील चर्च ओस पडू लागले आहेत. सहस्रो ख्रिस्ती नास्तिक होऊ लागले आहेत. या वस्तूस्थितीकडे केवळ मतांच्या राजकारणासाठी दुर्लक्ष करणारे द्रमुक सारखे राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

केवळ १०० वर्षांहून अधिक काळ थडगे अस्तित्वात आहे; म्हणून ते ‘संरक्षित स्मारक’ ठरू शकत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

केवळ १०० वर्षांहून अधिक काळ थडगे अस्तित्वात आहे; म्हणून ते ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम,१९५८’ कायद्याच्या अंतर्गत ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याचे कारण ठरू शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशात नमूद केले.