श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त चेन्नईमधील (तमिळनाडू) अरूमबक्कम येथे श्रीरामाचे पूजन

श्रीराम

चेन्नई – अयोध्या येथील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अरूमबक्कम येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात पातंजली योग केंद्राच्या सौ. प्रफुल्लता आणि श्री. रामचंद्रन यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर रामनामाचा जप करत श्री सिद्धिविनायक मंदिराकडून श्रीरामाची प्रतिमा घेऊन कार्यक्रम असलेल्या सभागृहापर्यंत फेरी काढण्यात आली. सभागृहात गणपतीपूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर भगवान शिव आणि श्रीराम यांची स्तुती करणारी भक्तीगीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. जयकुमार यांनी सहभाग घेतला. या वेळी सौ. सुगंधी जयकुमार यांनी श्रीरामाच्या गुणांविषयी माहिती सांगून त्यानंतर उपस्थितांकडून रामनामाचा जप करवून घेतला. या कार्यक्रमात अनेक रामभक्त उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.