Muslim Polygamy : मुसलमान पुरुषाने त्याच्या पत्नींना समान वागणूक देणे बंधनकारक  ! – मद्रास उच्च न्यायालय

इस्लामिक कायद्यानुसार मुसलमान पुरुषांना आहे बहुपत्नीत्वाचा अधिकार !

चेन्नई – इस्लामिक कायद्यानुसार मुसलमान पुरुषांना बहुपत्नीत्वाचा अधिकार आहे; परंतु मुसलमान पुरुषाने त्याच्या पत्नींना समान वागणूक देणे बंधनकारक आहे.  जर तोे तसे करत नसेल, तर ते क्रूरपणाचे ठरेल. पत्नीची योग्य काळजी घेणे, हे पतीचे कर्तव्य आहे, असा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाने याविषयी दिलेल्या एका निर्णयात दिला.

कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय वैधच !

एका प्रकरणात पीडित पत्नीने केलेल्या घटस्फोटाच्या मागणीला संमत्ती देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने या वेळी वैध ठरवला आहे. पती आणि त्याच्या कुटुंबियांनी पहिल्या पीडित पत्नीला त्रास दिल्याची नोंद उच्च न्यायालयाने घेतली. गरोदरपणातही तिला अयोग्य वागणूक दिली. याला कंटाळून पत्नीने सासरचे घर सोडले होते. नंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि तो दुसर्‍या पत्नीसमवेत राहू लागला होता.

क्रूरतेच्या आधारावर पत्नीला घटस्फोट मागता येतो !

अन्य एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते की, क्रूरतेच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा आदेश देण्यापूर्वी इतर परिस्थितींचाही विचार केला पाहिजे. क्रूरतेच्या आधारावर पत्नीला घटस्फोट मागता येतो.

संपादकीय भूमिका

‘सरकारने धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर केवळ मुसलमान पुरुषांना दिलेला बहुपत्नीत्वाचा अधिकार रहित करावा’, अशी मागणी जनतेने केली पाहिजे !