गृहिणीलाच घरातील सर्व कामे करण्यासाठी उत्तरदायी ठरवता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

पत्नी म्हणजे एखादी मालमत्ता किंवा वस्तू नाही. घरातील सर्व कामांची अपेक्षा पत्नीकडून करणे चूक आहे. गृहिणीकडूनच घरातील सर्व प्रकारच्या कामांची अपेक्षा केली जाते. ही पती-पत्नीच्या नात्यांमधील असमानता आहे. कोणतेही लग्न हे समानतेच्या तत्त्वावर आधारलेले आहे.

परभणी येथील ४ ग्राहकांकडून १ लाख ५१ सहस्र रुपयांची वीजचोरी !

‘रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सेंट्रेटर युनिट’ लावले म्हणून ही वीजचोरी निदर्शनास आली. युनिट न लावल्यामुळे आतापर्यंत अनेक जणांनी वीजचोरी केली असेल, त्याला उत्तरदायी कोण ? यामध्ये महावितरणची लक्षावधी रुपयांची हानी झाली आहे, ती आता कशी वसूल करणार ?

महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य; परंतु कर्नाटकच्या बसगाड्यांचा महाराष्ट्रात मुक्त वावर

कोरोना पडताळणी अहवाल असल्याविना कर्नाटकात महाराष्ट्रातील बस प्रवाशांना प्रवेश रहित करण्यात आला आहे; परंतु कर्नाटकातील बसगाड्यांनी महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करत पुण्यापर्यंत बस फेर्‍या चालवल्या आहेत.

कुंभमेळ्याला येणार्‍या सर्व संतांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावा लागणार !

१ एप्रिलपासून प्रारंभ होणार्‍या कुंभमेळ्यासाठी येणार्‍या संतांनाही ३ दिवस आधी कोरोना चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल सादर करावा लागणार आहे.

सध्याच्या कोरोना विषाणूमध्ये संसर्ग वाढवण्याचे प्रमाण अधिक ! – डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात सध्याचा कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवत असून नागरिकांचा हलगर्जीपणाही त्यासाठी कारणीभूत ठरत आहे, असे मत आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

वानवडी (पुणे) येथे गोमांस वाहतूक करणार्‍या वाहनातून १२ गोवंशियांचे मांस पकडले !

गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोवंश हत्या थांबलेली नाही ! माता म्हणून पूजल्या जाणार्‍या गोमातेचे रक्षण कायमचे होण्यासाठी हिंदूंचे राष्ट्र निर्माण व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

गेल्या ८ मासांत चिनी वस्तूंच्या खरेदीत ३ टक्क्यांची वाढ !

यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला देशभक्ती न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! भारतीय चीनकडून देशभक्ती शिकतील तो सुदिन !

अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील सक्षम लोकांना शिक्षण आणि नोकरी यांतील आरक्षण रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

या याचिकेत लोकांनी स्वछेने आरक्षण सोडावे, असा पर्याय देण्याचाही आग्रह केला आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून पुढील मासात सुनावणी होऊ शकते.

एखाद्या राजासारखे वागू नका ! – पंतप्रधान मोदी यांचा भाजपच्या नेत्यांना सल्ला

‘सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू आहे’, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. ते पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करत होते.

भाजपच्या नेत्यासह त्याच्या दोन्ही मुलांना अटक

भाजपचे नेते गुन्हेगारीत सहभागी असणे हिंदूंना अपेक्षित नाही !