हरिद्वार (उत्तराखंड) – येथे १ एप्रिलपासून प्रारंभ होणार्या कुंभमेळ्यासाठी येणार्या संतांनाही ३ दिवस आधी कोरोना चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल सादर करावा लागणार आहे. सर्व आखाड्यांच्या छावण्यांमध्ये रहाणार्या लोकांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. तसेच येथे कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे. १ एप्रिलपासून अधिकृतरित्या कुंभमेळा चालू होणार असला, तरी ११ मार्च या दिवशी महाशिवरात्रीला पहिले राजयोगी स्नान असणार आहे. त्यासाठी येणार्या संतांना या चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे.