अनाथालयातील मुलांवर लैैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चोरट्यांनी देवळातील चोरलेल्या घंटा परत केल्या !

सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !

नागपूर येथे ५५ सहस्र ‘को-वॅक्सिन’चा साठा आला; बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा चालू !

‘कोरोना वॅक्सिन’चा सर्वत्रच तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर येथे ५५ सहस्र ‘को-वॅक्सिन’चा साठा आला यामुळे ८ एप्रिलपासून बंद असलेले लसीकरण केंद्र ९ एप्रिल या दिवशी पुन्हा चालू झाले.

सातारा जिल्ह्यातही ‘कोविड – १९’ची लस संपली !

लस संपल्यामुळे जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर लसीकरण होऊ शकणार नाही’, असे जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे.

पुण्यात मंत्र्यांच्या उपस्थितीतच सदिच्छा भेटीच्या नावाखाली उद्घाटन सोहळा !

आपत्काळातही लोकप्रतिनिधींनी नियम न पाळणे हे गंभीर आहे. असे लोकप्रतिनिधी एरव्ही कसे वागत असतील, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

कामगारांना तात्काळ आर्थिक लाभ देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

वर्ष २०१६ पासून कामगारांचे लाभ प्रलंबित आहेत. दळणवळण बंदीच्या काळात संघाने कामगारांसाठी वस्तू वाटपात झालेला भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिला. त्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांचे थकित आर्थिक लाभ देण्यात यावेत.

पाकला विनामूल्य लस पुरवण्याऐवजी आधी भारतियांना कोविडची लस द्या !

भारतीय सैनिकांचे बळी घेणार्‍या पाकिस्तानला विनामूल्य लस पुरवण्याऐवजी सरसकट सर्व वयोगटांतील देशातील जनतेला विनामूल्य कोविडची लस उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे

मराठा आरक्षणप्रश्‍नी निकाल विरोधात गेल्यास उद्रेक होईल ! – उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

पाटण येथील तहसील कार्यालयासमोर १० फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण आयोजित करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.

५ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अटक !

कोरोनाने रुद्र रूप धारण केलेले असतांना अशा प्रकारे लाचखोरी करणार्‍या आरोग्य अधिकार्‍याला कठोर शिक्षा करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी.

नागपूर विद्यापिठाचा दीक्षांत समारोह रहित !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे दोन्ही दीक्षांत समारोह अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. येत्या काळात ‘ऑनलाईन’ पद्धतीने हे समारोह आयोजित केले जाऊ शकतात. त्या दृष्टीने विचार चालू आहे.