सातारा जिल्ह्यातही ‘कोविड – १९’ची लस संपली !

प्रातिनिधिक चित्र

सातारा, ९ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाची लसीकरण मोहीम लसीच्या तुटवड्यामुळे सध्या बंद पडली आहे. ‘लस संपल्यामुळे जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर लसीकरण होऊ शकणार नाही’, असे जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे. जिल्ह्यातील ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३२६ उपकेंद्रे येथे लसीकरण चालू होते. प्रशासनाने प्रतिदिन २० सहस्र लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र लसीअभावी मोहीम बंद करण्यात आली.