सातारा, ९ एप्रिल (वार्ता.) – अन्य समाजाप्रमाणे मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणाविषयी न्यायालयात न्याय मिळाला नाही, तर जनतेने आमदार, खासदार यांचे त्यागपत्र घेऊन त्यांना पदावरून खाली खेचावे. तसेच याला उत्तरदायी म्हणून त्यांना घरातून बाहेर पडू देऊ नये. मराठा आरक्षणप्रश्नी निकाल विरोधात गेला, तर जनतेमधून उद्रेक होईल, अशी चेतावणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
पाटण येथील तहसील कार्यालयासमोर १० फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण आयोजित करण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ते तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.