मौजे कासवान (छत्रपती संभाजीनगर) येथे अंदाजे ३५ ब्रास अवैध वाळू साठा जप्त !

पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), मौजे पाडळी येथील ग.नं. १४४ मधून अवैधरित्या मुरूम उत्खनन आणि वाहतूक करतांना आढळून आलेला ३ हायवा अन् १ जेसीबी यांच्यावर १६ जानेवारीला दंडात्मक कारवाई करून १३ लाख ५० सहस्र वसूल करण्यात आले आहेत.

आदिवासी गरोदर महिला आणि बालके यांचे कुपोषण शून्यावर आणण्याचे प्रयत्न ! – महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे

‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’तून आदिवासी क्षेत्रांतील गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना चौरस आहार प्रतिदिन देण्यात येतो. ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांनाही आहार देण्यात येतो. त्यातून कुपोषण अल्प होत आहे.

नांदुरा (जिल्हा हिंगोली) पाणीपुरवठासंबंधी त्रयस्थ आस्थापनांकडून चौकशी !

नांदुरा येथील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा बंद पडल्यामुळे ७ जानेवारी २०२५ या दिवशी आंदोलन केले होते. त्या प्रकरणी उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कळमनुरी आणि त्रयस्थ तांत्रिक पडताळणी संस्था म्हणून ‘टाटा कन्सल्टींग इंजिनीयर्स लि.’ यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.

नागपूर येथील लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्थेस प्रयोगशाळा आणि ‘इन्क्युबेशना’साठी निधी देऊ !

‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’तील ‘लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्थे’स प्रयोगशाळा आणि ‘इन्क्युबेशन’ विभागाकरता १ कोटी ७४ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यांच्या मागणीनुसार उर्वरित निधी दिला जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोणी कॉर्नर ते कवडी पाट पथकर नाक्यापर्यंत वाहनांच्या ५ किलोमीटर रांगा !

पुणे शहरात अवजड वाहनांना बंदी घातल्याने कवडीपाट पथकर नाक्यापासून लोणीपर्यंत ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूककोंडी झालेली होती.

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ घोषित !

डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी वर्ष २०२५ चा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला आहे.

बालिकेवर अत्याचार करणार्‍याला २३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

अशा प्रकारे सर्वच अत्याचारांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या वडिलांना अटक !

उल्हासनगर येथे रहाणार्‍या ११ वर्षांच्या मुलीवर वडिलांनी अत्याचार केले. वर्गशिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वडिलांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

नागपूर येथे पोलिसांवर आक्रमण करणार्‍या जिहादी मानसिकतेच्या गुंडांवर कडक कारवाई करा !

सकल हिंदु समाजाचे ठिकठिकाणी निवेदन

भ्रमणभाषवर क्रिकेट सामना पहात बस चालवणार्‍याला कामावरून काढले !

क्रिकेटचा सामना पहात बस चालवणार्‍या चालकावर एस्.टी. महामंडळाने कारवाई केली आहे. या बसचालकाला कामावरून काढण्यात आले आहे. तसेच चालक पुरवणार्‍या खासगी आस्थापनाला ५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.