ग्रामसेवकाला लाच घेतांना पकडले !

या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यावर त्यांनी सापळा रचून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना आरोपीला पकडले.

नगर येथील २ पोलिसांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

४३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता ८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे, तसेच दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

निवडणुकीसाठी राष्ट्रपुरुषांचा उपयोग करू नये ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

कर्नाटकमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

थोर पुरुषांची नावे वापरून गोतस्करी करणार्‍यांवर कारवाई करा ! – राष्ट्रीय छावा संघटना

थोर पुरुषांची नावे वापरून अवैध कृत्ये करणार्‍यांवर कारवाईची मागणी करणार्‍या ‘राष्ट्रीय छावा संघटने’चे अभिनंदन !

अमित शहा यांच्या गोवा दौर्‍याची सिद्धता अंतिम टप्प्यात

फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ४ वाजता होणार्‍या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याची सिद्धता युद्धपातळीवर चालू असून ती अंतिम टप्प्यात पोचली आहे.

कर्नाटककडून कळसानंतर आता भंडुरा प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण

कर्नाटक सरकार या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून गोव्याची जीवनदायिनी म्हणून गणल्या गेलेल्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमधील मलप्रभा नदीत वळवण्याच्या सिद्धतेत आहे. कर्नाटक सरकार धरण बांधून भंडुरा नाल्याचे २.१८ टी.एम्.सी. पाणी मलप्रभा नदीत वळवणार आहे.

हलाल प्रमाणपत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे संकट ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे संकट असून बहुतांश लोकांना या संकटाविषयी माहितीही नाही. त्यामुळे प्रत्येकाने याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कतरास (झारखंड) अन् हावडा (बंगाल) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मंदिरांमध्ये साकडे आणि प्रतिज्ञा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्वास्थ्य चांगले रहावे, यासाठी कतरासमधील (झारखंड) संकटमोचन मंदिर, सूर्य मंदिर आणि हनुमान मंदिर, तसेच हावडा (बंगाल) येथील चॅटर्जी हाट येथील बोरो मां सेवालय मंदिर या सर्व ठिकाणी देवतांना साकडे घालण्यासह हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.

हाजीपूर (बिहार) येथे सनातन संस्थेच्या वतीने आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन पार पडले !

पाटलीपुत्र जिल्ह्यातील सारणच्या हाजीपूर येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. सानिका सिंह यांनी घेतले.

वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी (पुणे) शहर असुरक्षित !

जानेवारी ते मार्च या ३ मासांच्या कालावधीत शहरात १४ हत्या, ६९ बलात्कार, ९३ लूटमार आणि ४० दंग्याच्या घटना घडल्या.