अधिकोषाकडे भूमी गहाण ठेवून फसवणूक करणार्‍या संचालकांसह अधिकोषाच्या अधिकार्‍यांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

‘मे. अमित एंटरप्रायजेस दि इंडियन हौसिंग लि.’च्या सर्व संचालकांसह अधिकोषाच्या अधिकार्‍यांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आजरा (कोल्हापूर) येथील रवळनाथ मंदिराच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी संमत ! – प्रकाश आबीटकर, आमदार, शिवसेना

७०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या आणि आजरा शहरासह तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रवळनाथ देवालयाच्या नूतन बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परभणी येथे तरुणीवर अत्याचार करणार्‍यावर पोलिसांकडून गुन्हा नोंद !

विवाहाचे आमीष दाखवत २२ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करणार्‍यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्याने तरुणीला मारहाणही केली होती. आरोपीचे नाव अनिकेत अग्रवाल असे आहे.

श्री बालाजी आणि पंचमुखी मारुति देवस्थान ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने २१ व्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन !

हा कार्यक्रम पनवेल जुने भाजी मार्केट येथील श्री बालाजी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा घेऊन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार ! – अमोल येडगे, नूतन जिल्हाधिकारी, कोल्हापूर

अवैध मदरसा पाडल्यावर पूर्वीच्या जिल्हाधिकार्‍यांनी ‘मुसलमान समाजाने सर्व कागदोपत्री पूर्तता केल्यावर मदरसा बांधण्यास अनुमती दिली जाईल’, असे आश्वासन दिले आहे.

खांदेश्वर येथे ‘क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड बिल्डर वेल्फेअर असोसिएशन’च्या वतीने भव्य मालमत्ता प्रदर्शनास प्रारंभ !

या प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

‘मराठी भाषा दिना’निमित्त २५ फेब्रुवारी या दिवशी ‘संकल्प ग्रुप, मुंबई’ यांच्या वतीने निबंध स्पर्धा !

या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ५ वी आणि ६ वी ते १० वी असे दोन गट असतील. प्रत्येक गटातून प्रथम ३ क्रमांकासाठी आणि सुंदर हस्ताक्षरासाठी असे एकूण ४ विजेते निवडले जातील.

मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी २४ घंटे २ शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती !

पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती.

पुणे विद्यापिठात नाटकातून प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍या कलाकार विद्यार्थ्यांना अभाविपकडून चोप ! (Denigration Of Prabhu ShriRam)

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात कलेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अपमान करणे लज्जास्पद आहे.

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार !

हिंदी चित्रपटामध्ये पाकिस्तानी गायकाला गाण्याची संधी देणारे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हे राष्ट्रघातकीच होत ! अशांच्या चित्रपटावर बहिष्कार घालणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे राष्ट्रकर्तव्य होय !