राज्यात ३४२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मद्य आणि अमली पदार्थ कह्यात !

मद्य, पैसा आणि अमली पदार्थ यांच्या जोरावर मतदान होणे, ही लोकशाहीची थट्टा होय !

वझरे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ग्रामस्थांनी गावातील अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले !

अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? अवैध कृत्यांच्या विरोधात जनतेलाच संघटित होऊन आवाज उठवावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथमोपचार शिबिराला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चिंचवड येथील गोखले सभागृहामध्ये ‘आपत्काळासाठी संजीवनी असणारा प्रथमोपचार’ शिकण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले होते.

भंडारा येथे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची जुमदेव महाराजांच्या सेवकांची मागणी !

नवधर्माची शिकवण देणारे बाबा जुमदेव महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करून बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी बाबा जुमदेव महाराज यांच्या सेवकांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापिठातील वसतीगृहात प्राथमिक सुविधांची वानवा, विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष !

वसतीगृहामध्ये प्राथमिक सुविधांची वानवा असणे, हे संतापजनक आहे. याकडे दुर्लक्ष करणार्‍या असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी १२ आतंकवाद्यांना वाचवण्याचे काम केले ! – राम सातपुते, भाजपचे सोलापूर येथील उमेदवार

मुख्यमंत्री असतांना सुशीलकुमार शिंदे यांनी आतंकवाद प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या सोलापूरमधील १२ आतंकवाद्यांना वाचवत तुष्टीकरणाचे राजकारण केले, असा आरोप सातपुते यांनी केला आहे

कुर्ला (मुंबई) येथे अमली पदार्थ विकणार्‍या १० आरोपींना अटक !

१२६ किलो अमली पदार्थासह ३ कोटी ४६ लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त

पवना नदीत राडारोडा टाकणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

केवळ गुन्हे नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

आज भुजबळांवरील आरोपांविषयी परत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिनांक मिळत नव्हता.

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ४ जण १ वर्षासाठी हद्दपार !

हद्दपारी म्हणजे अन्य ठिकाणी जाऊन गुन्हेगारी करण्याची मोकळीक !