श्री तुळजाभवानी मंदिर : दानपेटी घोटाळ्यातील १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी केवळ चर्चा न करता यावर कायदेशीरदृष्ट्या लढा देणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे हे मोठे यश आहे.

Dhabholkar Murder Case : बहुचर्चित डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा १० मे या दिवशी निकाल लागण्याची शक्यता !

या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू आहे.

जुन्नर येथे बिबट्याने केलेल्या आक्रमणात एकाचा मृत्यू !

काळवाडी (जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात मामाच्या घरी यात्रेसाठी आलेल्या रुद्र महेश फापाळे या ८ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

(म्हणे) ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर श्रीराममंदिराचे शुद्धीकरण करू !’ – नाना पटोले

ज्याविषयी काही ठाऊक नाही, त्याचा आधार घेऊन हिंदूंची दिशाभूल करायला निघालेली काँगे्रस ! निधर्मी काँग्रेसच्या नेत्यांना धर्म, अधर्म असे शब्द उच्चारणे शोभत नाही !

पुणे येथील महंमदवाडी परिसरात २० जणांच्या टोळीचे तरुणावर आक्रमण !

पुणे येथे गुन्हेगारीचा कळस ! संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी वाढणे लज्जास्पद ! वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना करणार का ?

अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी यांचे राज्य परिवहन मंडळाच्या बँकेतील संचालकपद रहित

सदावर्ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी नियम मोडल्याचे निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलल्या, पक्ष तयार केले आणि पुन्हा काँग्रेसमध्येही गेले. आता पुन्हा एकदा त्यांनी तसेच संकेत दिले आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकांवर गुन्हा नोंद !

वेल्हा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. ती ६ मे या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत चालू होती.

निवडणुकीच्या संदर्भातील छायाचित्रे, ध्वनीचित्रीकरण समाजमाध्यांवर प्रसारित करणार्‍यांवर गुन्हे नोंद !

इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक २१ आणि २५३ मतदान केंद्र येथे एकाने भ्रमणभाष केंद्रात नेण्यास बंदी असतांना त्याच्यासह आत प्रवेश करून चित्रीकरण केले.

मुंबईत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोकड आणि अवैध मद्य जप्त !

निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सर्वत्र होणारे अपप्रकार व्यवस्थेचे अपयश दर्शवतात !