जुन्नर (पुणे) – काळवाडी (जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात मामाच्या घरी यात्रेसाठी आलेल्या रुद्र महेश फापाळे या ८ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास रुद्र घराबाहेर खेळत असतांना बिबट्याने अचानक आक्रमण करून त्याला पकडले. शेजारच्या उसाच्या शेतात त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आले. बिबट्याची आक्रमणे थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि वन विभाग यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.