पुणे येथील महंमदवाडी परिसरात २० जणांच्या टोळीचे तरुणावर आक्रमण !

वाहनांच्या तोडफोडीनंतर रस्त्यावर हाणामारीची घटना घडली !

प्रतीकात्मक चित्र

पुणे –  येथील महंमदवाडी परिसरात असलेल्या ‘गंगा फ्लोरेंटीना सोसायटी’च्या बाहेर किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये प्रचंड हाणामारी झाली आहे. २० जणांच्या टोळीने २ तरुणांवर जीवघेणे आक्रमण केले. आक्रमणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. आधी याच परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. वाहनांच्या तोडफोडीनंतर रस्त्यावर हाणामारीची घटना घडली.

संपादकीय भूमिका :

पुणे येथे गुन्हेगारीचा कळस ! संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी वाढणे लज्जास्पद ! वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना करणार का ?