Dhabholkar Murder Case : बहुचर्चित डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा १० मे या दिवशी निकाल लागण्याची शक्यता !

डॉ. दाभोलकर

पुणे – २० ऑगस्ट २०१३ या दिवशी येथील महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली.  या प्रकरणाचे अन्वेषण प्रारंभी पुणे पोलीस, आतंकवादविरोधी पथक यांच्याकडे होते. नंतर ते सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, सनातनचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली. यानंतर आजपर्यंत, म्हणजे गेल्या १० वर्षांहून अधिक काळ हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू आहे. आता एवढ्या प्रदीर्घ काळानंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल आता अंतिमतः १० मे २०२४ या दिवशी लागण्याची शक्यता आहे.