पुण्यात अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना अटक

कोंढवा बुद्रुक परिसरातील अ‍ॅमेझॉनच्या गोदामात ‘मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही’ अशा घोषणा देत तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ८ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी २८ डिसेंबर या दिवशी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिर्डीतील साईमंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर चालू रहाणार !

नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रतिवर्षी साई मंदिर हे ३१ डिसेंबरला रात्रभर चालू ठेवण्यात येत असते. तीच परंपरा कायम ठेवत या वर्षीसुद्धा शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर चालू रहाणार आहे, अशी माहिती शिर्डी संस्थानच्या वतीने देण्यात आली.

राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील नियमावलीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ

राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या लागू असलेली नियमावली ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला केला आहे.

यांत्रिक पद्धतीने (पर्ससीन) मासेमारी करण्यास १ जानेवारीपासून ५ मास बंदी

यांत्रिक पद्धतीने मासेमारी करतांना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.

रेडी येथील समुद्रात बुडणार्‍या पर्यटकाला जीवरक्षकाने वाचवले

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील समुद्रात बुडणारा देहली येथील पर्यटक परवेझ खान याला येथील ‘जीवरक्षक’ संजय गोसावी यांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले.

बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि पीडित यांचा तपशील प्रसारमाध्यमांनी उघड करू नये ! – तुषार पाटील, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २३ मध्ये कोणत्याही प्रसारमाध्यमाच्या वृत्तामध्ये बालकाची ओळख उघड होईल, असा तपशील उघड होणार नाही, असे नमूद असल्याचे अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

एस्.टी.ची सेवा अधिक सक्षम करणार !  – अनिल परब, परिवहन मंत्री, महाराष्ट्र

कुडाळ शहरातील गांधी चौक येथे एस्.टी.च्या नूतन बसस्थानकाचे उद्घाटन परिवहनमंत्री परब यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले.

निधन वृत्त

सनातनच्या साधिका सौ. भारती बाडगी यांच्या आई श्रीमती मंगला यशवंत फडके (वय ९१ वर्षे) (आध्यात्मिक पातळी – ६१ टक्के) यांचे २८ डिसेंबर या दिवशी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्‍वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.