पुणे – अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेला स्थान दिले जावे, अशी मागणी मनसेने केली होती. प्रारंभी अॅमेझॉनकडून मनसेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे मनसे आक्रमक झाली. त्यामुळे कोंढवा बुद्रुक परिसरातील अॅमेझॉनच्या गोदामात ‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’ अशा घोषणा देत तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ८ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी २८ डिसेंबर या दिवशी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने नोटीसही बजावली होती. त्यानंतर मनसे अधिकच आक्रमक झाली होती.