रेडी येथील समुद्रात बुडणार्‍या पर्यटकाला जीवरक्षकाने वाचवले

प्रतीकात्मक छायाचित्र

वेंगुर्ला – तालुक्यातील रेडी येथील समुद्रात बुडणारा देहली येथील पर्यटक परवेझ खान याला येथील ‘जीवरक्षक’ संजय गोसावी यांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले.

देहली येथील खान हा युवक ३० डिसेंबरला रेडी येथील यशवंत गडावर फिरण्यासाठी आला होता. थोड्या वेळाने तो पोहण्यासाठी येथील समुद्रात उतरला; मात्र पुढे जात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तो बुडत असल्याचे पाहून गोसावी यांनी समुद्रात उडी मारून ते त्याच्यापर्यंत गेले अन् त्याला सुखरूप बाहेर आणले. खान याने गोसावी यांचे आभार मानले, तर रेडीचे सरपंच रामसिंग राणे आणि वेंगुर्ला पोलीस ठाणे यांच्या वतीने गोसावी यांचे अभिनंदन करण्यात आले.