(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये द्वेष पसरवला जातो ! – नसीरुद्दीन शाह

मशिदींमधून लव्ह जिहादचे फतवे निघतात, धर्मांध युवकांना पैसा पुरवला जातो, याची कबुली शेकडो प्रकरणांत युवकांनी पोलीस ठाण्यांत दिलेली आहे, हे शाह यांना माहीत नाही काय ?

७० पैकी ४५ ग्रामपंचायती भाजपकडे, तर शिवसेनेची २१ ग्रामपंचायतींवर सत्ता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली होती. त्याचा निकाल १८ जानेवारीला घोषित झाला. या वेळी ७० पैकी ४५ ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेला २१ ग्रामपंचायतींत यश मिळाले.

हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ट्विटरवर #21YearsOfSanatanPrabhat या हॅशटॅगद्वारे व्यापक धर्मप्रसार !

हिंदी पाक्षिक सनातन प्रभातला २१ वर्षे पूर्ण झाली.

ग्रामीण भागातील पोलीस ठाणे इमारतीचा प्रश्‍न सोडवणार ! – शंभूराज देसाई, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री

ग्रामीण भागातील विशेषतः डोंगरी भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारती या संदर्भात विविध प्रश्‍न आहेत.

नाशिकच्या ओझर येथील पशूवधगृहातून १ सहस्र ९०० किलो गोवंशियांचे मांस जप्त

कायद्याचा धाक कुणाला राहिलेलाच नाही, याचे कारण निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासन हेच आहे. पोलिसांवर राज्यकर्त्यांचा असलेला दबावही याला कारणीभूत आहे !

कोरोनाच्या काळात कोरोना योद्धयांचे योगदान अतुलनीय ! – उज्वल निकम, अधिवक्ता

कोरोना योद्धयांनी जिवाची पर्वा न करता अवितरपणे केलेले काम निश्‍चितच गौरवास्पद आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे ! – भाजप महिला मोर्च्याची मागणी

धनंजय मुंडे यांनी तक्रारदार महिलेच्या बहिणीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांची स्वीकृती दिली आहे. मुंडे यांना ५ अपत्ये असल्याची वस्तूस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोग आणि जनता यांची फसवणूक केली आहे.

मुंबईत साहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मांजाने गळा चिरला

चिनी नायलॉन मांजाचे विक्रेते आणि ग्राहक यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार ?

तांडव’च्या निर्मात्यांविरोधात राम कदम यांची पोलिसात तक्रार

‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान करण्यात आल्याने भाजपचे आमदार राम कदम यांनी निर्मात्यांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

टी.आर्.पी. घोटाळा प्रकरणातील बार्कचे पार्थो दासगुप्ता रुग्णालयात भरती

रेटिंग एजन्सी बार्कचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे.