तांडव’च्या निर्मात्यांविरोधात राम कदम यांची पोलिसात तक्रार

भाजपचे आमदार राम कदम

मुंबई – ‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान करण्यात आल्याने भाजपचे आमदार राम कदम यांनी निर्मात्यांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अभिनेता सैफ अली खान याची ही वेब सिरीज आहे. राम कदम यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे या वेब सिरीजचे निर्माता, दिग्दर्शक आणि यात काम करणारे कलाकार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.


राम कदम यांनी टि्वटही करून अभिनेता सैफ अली खानवर टीका केली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी धार्मिक भावना दुखावणारे दृश्य हटवले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.