हिंदु राष्ट्र घोषित करून मगच शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले आणि हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली.

चाफळ (जिल्हा सातारा) येथे अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी मोठी कारवाई

चाफळ येथील माथणेवाडी रस्त्यावर अनधिकृतपणे मुरुम उत्खनन चालू होते. ही माहिती मिळाल्यावर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत १० ब्रास मुरुम, १ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर कह्यात घेत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला.

चिखली (जिल्हा बुलढाणा) मतदारसंघात ब्राह्मण समाजावर कधीही अन्याय होणार नाही ! – आमदार श्‍वेता महाल्ले 

ब्रह्मांडाचे ज्ञान असलेला आणि ईश्‍वराच्या पुष्कळ जवळ असलेला, म्हणजे ब्राह्मण. अशा ब्राह्मण समाजावर चिखली मतदारसंघात कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार सौ. श्‍वेता महाल्ले यांनी केले.

पुण्यातील कोरड्या कचर्‍यात खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वाधिक

पर्यावरणासाठी घातक अशा या कचर्‍याविरोधात ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लास्टिक’ ही चळवळ विविध देशांत राबवण्यात येत आहे. ‘या आस्थपनांनी पुनर्वापरास योग्य पिशव्यांचा वापर करावा’, अशी मागणी कचरावेचक संस्थांनी केली आहे.

किरीट सोमय्यांना जिवे मारण्याची धमकी

‘‘सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घालणार सोमय्या’’ अशा शब्दांत धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती सोमय्या यांनी दिली.

मुंबईत नवजात बालकांची विक्री-खरेदी करणारी टोळी अटकेत; आधुनिक वैद्यासह परिचरिकांना अटक

गुन्हे शाखेने नवजात बालकांची विक्री आणि खरेदी करणार्‍या टोळीला सापळा रचून तीन जणांना कह्यात घेऊन अटक केली .

धनंजय मुंडें यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची आणि जनतेची फसवणूक केल्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी केली.

सरपंचपदाचे आरक्षण एक मासात काढणार – ग्रामविकास मंत्री

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे – मंत्री हसन मुश्रीफ

‘तांडव’ वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची क्षमायाचना

‘जफर यांनी क्षमा मागितली असली, तरी जोपर्यंत या वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत विरोध चालूच रहाणार’, असे हिंदू आणि त्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचे यशाचे दावे !

सर्वाधिक ग्रामपंचायतींत भाजपचा विजय झाल्याचा दावा भाजपने, तर ८० टक्के ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९ जानेवारी या दिवशी निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट होईल.