दुर्गनाद प्रतिष्ठान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी केलेल्या कवलापूर (जिल्हा सांगली) येथील सिंहगडाच्या प्रतिकृतीचे अनावरण !

सिंहगडाची प्रतिकृती

सांगली, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – दुर्गनाद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी ३ मासांच्या अथक प्रयत्नांनंतर कवलापूर येथे सिंहगडाची प्रतिकृती साकार केली आहे. अवघ्या महाराष्ट्राने बघावी अशी हुबेहुब असलेल्या या प्रतिकृतीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले आणि मिरजचे युवा नेते श्री. सागर वनखंडे यांच्या हस्ते अनावरण पार पडले.

सिंहगडाच्या प्रतिकृतीचे श्रीफळ वाढवून अनावरण करतांना श्री. नितीन चौगुले

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी श्री. सुनीलबापू लाड (नाना) यांच्या मार्गदर्शनाखाली आताच्या पिढीला शिवछत्रपतींच्या गडकोटांची माहिती व्हावी या उद्देशाने ही प्रतिकृती सिद्ध केली आहे. सिंहगड (कोंढाणा) कसा असेल, हे पहायचे असेल, तर सांगली-तासगाव रस्त्यावरील कवलापूर येथे भेट द्यावी. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व शिवभक्तांसाठी ही प्रतिकृती खुली असणार आहे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.