शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले !

काँग्रेसेचे नेते दिग्विजय सिंह यांनी पाकच्या पत्रकाराला कलम ३७० रहित करण्याचे आश्‍वासन दिल्याचे प्रकरण
दिग्विजय सिंह यांना त्यांच्या काश्मिरी हिंदू असलेल्या भावजयेकडून घरचा अहेर !

हिंदु वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती मुलाकडून मृतदेह पुरण्याची मागणी नातीने फेटाळत केले अंत्यसंस्कार !

हिंदु संस्कारानुसार कृती करणार्‍या अशा तरुणींकडून हिंदूंनी आदर्श घ्यावा !

भोपाळ शहरातील मोगलकालीन ‘लालघाटी’ आणि ‘हलालपुरा’ नावे पालटा !

मुळात अशी नावे पालटण्याची मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून मोगलांनी दिलेली नावे पालटली पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराच्या खाली आढळल्या जुन्या मूर्ती आणि भिंती !

या मूर्ती आणि भिंती या ११ व्या किंवा १२ व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागातील तज्ञांचे मत आहे. खोदकामाच्या वेळी अन्यही ऐतिहासिक वस्तू आढळतील, अशी आशा पुरातत्व विभागाने व्यक्त केली आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन करत मध्यप्रदेशातील माजी मंत्र्याच्या अंत्यसंस्कारास सहस्रो लोकांची गर्दी

भाजपच्या राज्यात भाजपच्याच नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अशा प्रकारचे उल्लंघन होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

११० किमी प्रती घंटा वेगाने रेल्वेगाडी गेल्याने रेल्वेस्थानकाच्या इमारतीचा भाग कोसळला !

भारतातील रेल्वेस्थानकांच्या इमारतींची ही स्थिती असेल, तर भारतातील रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यापूर्वी स्थानकांची स्थिती पालटायला हवी, हे लक्षात येते !

हुंड्यासाठी छळ करणार्‍या बाहेरख्याली पोलीस पतीला पत्नीने जाळ्यात अडकवून रंगेहाथ पकडले !

गुप्तचर शाखेचा अधिकारी सत्यम बहल याला त्याच्या पत्नीने सापळा रचून अन्य महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यावरून रंगेहाथ पकडले. यामुळे पत्नीने पोलीस उपमहानिरीक्षकांकडे पतीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

कोरोनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम करतांना ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणार्‍या परिचारिकेला स्थानिकांनी पकडले !

अशांना नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे ! हिंदु सहिष्णु असल्याने त्यांचा अपलाभ घेण्याच्या होणार्‍या या प्रयत्नांविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

खांडवा येथे १७ वर्षे जुन्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्याचा अयशस्वी प्रयत्न !

येथे राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला असता ती चालूच झाली नाही. तिला धक्काही मारण्यात आला, तरीही ती जागची हलली नाही.

सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !

पोलिसांनी नियम मोडणार्‍या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा उपाय चालू केला आहे.