
इंदूर (मध्यप्रदेश) – गुप्तचर शाखेचा अधिकारी सत्यम बहल याला त्याच्या पत्नीने सापळा रचून अन्य महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यावरून रंगेहाथ पकडले. यामुळे पत्नीने पोलीस उपमहानिरीक्षकांकडे पतीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. सत्यम बहल याने फेसबूकवर एका महिलेशी मैत्री केली आणि अश्लील भाषेत बोलण्यास चालू केले. त्यानंतर त्याने त्या मैत्रिणीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी भेटायला बोलावले. ही मैत्रिण अन्य कुणी नाही, तर त्याची पत्नी होती आणि तिनेच हा सापळा रचला होता. पत्नी सत्यम बहल याच्यावर आधीपासूनच संशय घेत होती.
पत्नी मनीषा हिचे सत्यम बहल याच्याशी गेल्या वर्षी २२ फेब्रुवारीला लग्न झाले होते. लग्नानंतर ३ मासांनी त्यांच्यात हुंड्यावरून वाद चालू झाला. सत्यम तिचा छळ करत होता. सत्यम बहल मनीषाला मारहाण करत होता, तसेच ‘मी तुझ्यावर खोेटे गुन्हे नोंदवून तुला अडचणीत टाकू शकतो’, अशी धमकीही तो देत होता. (पोलीस निरपराध्यावर खोटे गुन्हे नोंदवून त्याला अडकवतात, हे यातून स्पष्ट होते ! – संपादक) त्याचे अन्य महिलांशी संबंध असल्याचा संशय आल्याने मनीषाने सापळा रचून बहल याला रंगेहाथ पकडले.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !