गोमूत्र अर्क प्यायल्यामुळे कोरोना झाला नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे, असे मत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.

सर्वांनी यज्ञ करून आहुती दिल्यास कोरोनाची तिसरी लाट देशाला स्पर्शही करू शकणार नाही ! – मध्यप्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर

यज्ञ-यागत सामर्थ्य आहे आणि ते करणे केव्हाही चांगलेच; मात्र त्यासह प्रत्येक भारतियाने कठोर साधना करून ईश्‍वराला आळवले, तर कोरोनाचे नव्हे, तर कुठल्याही संकटातून ईश्‍वर देशाला तारणार, हे निश्‍चित !

भोपाळ येथे १ सहस्र खाटांच्या कोविड सेंटरमध्ये रामायण, महाभारत यांचे प्रसारण

दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आणि गायत्री मंत्र यांचा जप चालू ठेवण्यात येत आहे. तसेच प्रतिदिन योगासनेही शिकवली जात आहेत.

कोरोना नियमांचे उल्लंघन करून मशिदींमध्ये सामूहिक नमाजपठण !

हरिद्वार कुंभेमळ्याच्या सूत्रावरून टीका करणारे तथाकथित निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

ग्वाल्हेर येथे रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार्‍या विमानाला अपघात : वैमानिकासह तिघे घायाळ

ग्वाल्हेर येथे कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार्‍या विमानाला झालेल्या अपघातात वैमानिक आणि अन्य दोघे घायाळ झाले.

कोरोनाबाधित तरुणीशी अश्‍लील वर्तन करणार्‍या २ वॉड बॉयची नोकरीवरून हकालपट्टी

कोरोना संकटाच्या काळात अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !

धार येथील प्लांटमध्ये ऑक्सिजन भरतांना झालेल्या स्फोटात ६ जण घायाळ

येथील पीथमपूर सेक्टर ३ मधील रानीका इंडस्ट्री लिमिटेडच्या प्लांटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरतांना झालेल्या स्फोटात ६ कर्मचारी घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील रुग्णालयात ऑक्सिजन न्यून झाल्याने ५ रुग्णांचा मृत्यू

डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार करणार्‍या व्यक्तीला कानाखाली लगावण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांचे उद्दाम उत्तर !

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा संयम संपला आहे. त्यामुळे ते आक्रमक होत आहेत. अशा वेळी त्यांना आश्‍वस्त करून त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.

मी देशासाठी लढतो; मात्र माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीत ! – सैनिकाची खंत

सीमा सुरक्षा दलातील एका सैनिकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यासाठी संबंधित सैनिक प्रयत्न करत आहे; मात्र एकाही रुग्णालयात खाट उपलब्ध नसल्याने त्याला बराच त्रास सहन करावा लागला.