भोपाळ शहरातील मोगलकालीन ‘लालघाटी’ आणि ‘हलालपुरा’ नावे पालटा !

खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी मागणी

मुळात अशी नावे पालटण्याची मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून मोगलांनी दिलेली नावे पालटली पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहरातील लालघाटी आणि हलालपुरा या दोन बस स्थानकांची नावे पालटण्याची मागणी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि नगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र लिहून नावात पालट करण्यास सांगितले आहे. या दोन्ही नावांच्या मागे वाईट इतिहास असल्याने ती नावे योग्य नाहीत. त्यामुळे त्यांची नावे पालटण्यात यावीत, असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे.

यापूर्वी राज्यातील मिंटो हॉल, ईदगाह हिल्स, रायसेन जिल्ह्यातील अब्दुल्लागंज, गैरतगंज, बेगमगंज, होशंगाबाद आदी नावे पालटण्याची मागणी करण्यात आली आहे. ही सर्व नावे मोगलांच्या काळातील आहेत.