(म्हणे) ‘आदि शंकराचार्य यांच्यामुळे जातीव्यवस्था अस्तित्वात आली !’ – साम्यवादी नेत्याचा फुकाचा आरोप

हिंदु धर्मात जाती व्यवस्था नाही, हेही ठाऊक नसलेले साम्यवादी. हिंदु धर्माचा काडीचाही अभ्यास न करता अशी वक्तव्ये करून हिंदूंना भ्रमित करणार्‍यांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करावा !

केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात ख्रिस्त्यांनी साजरा केला ख्रिसमस !

पद्मनाभ मंदिराचे सरकारीकरण केल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या !  

पाद्री राजू कोक्केन याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांची शिक्षा !

अन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे प्रेम आणि शांती यांचा संदेश देणारे पाद्रयांचे वासनांध रूप समाजासमोर आणत नाहीत, हे लक्षात घ्या !

केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या ठेवी ! – माहितीच्या अधिकारात तपशील उघड

त्रिसूर येथील गुरुवायूरमधील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि २७१.०५ एकर भूमी आहे, ‘माहिती अधिकारा’त मागवलेल्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे.

कोच्ची (केरळ) येथील ‘कार्निव्हल’मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्‍याप्रमाणे बनवण्यात आला पुतळा !

भाजपच्या आरोपानंतर पुतळ्यात पालट करण्याचे आयोजकांचे आश्‍वासन !

केरळमध्ये एन्.आय.ए.ने पी.एफ्.आय.च्या ५६ ठिकाणी घातल्या धाडी !

बंदी घातल्यानंतर या संघटनेतील दुसर्‍या फळीतील नेते वेगळ्या नावाने पी.एफ्.आय.चे काम करत असल्याच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर या धाडी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसने बहुसंख्य हिंदूंनाही समवेत घेतले पाहिजे !

राजकीय लाभासाठी आतापर्यंत मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ करत त्यांना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणार्‍या काँग्रेसला आता पुन्हा सत्तेत येण्याठी हिंदूंची आठवण होऊ लागली आहे, हे लक्षात घेऊन अशा ढोंगी आणि हिंदुद्वेषी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व नष्ट होईपर्यंत हिंदूंनी शांत बसू नये !

केरळमध्ये नाताळच्या वेळी २ चर्चमध्ये प्रार्थनेवरून ख्रिस्त्यांच्या गटांत हाणामारी !

‘हिंदु धर्मात जाती-जातींत भेदभाव असून त्यांच्यात वाद होतात’, अशी वृत्ते प्रसारित करणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्त्यांमधील गटबाजी आणि त्यामुळे होणारी हाणामारी याकडे मात्र दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

केरळमधील पी.एफ्.आय.चे नेते इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या संपर्कात होते !

पी.एफ्.आय.च्या अशा देशद्रोही नेत्यांवर जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

कारागृहात असतांना पंडित नथुराम गोडसे यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न झाला होता !

भाजपचे केरळमधील नेते टी.जी. मोहनदास यांचा दावा