काँग्रेसने बहुसंख्य हिंदूंनाही समवेत घेतले पाहिजे !

काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांचा मुसलमानप्रेमी काँग्रेसला घरचा अहेर !

काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी

थिरूवनंतपूरम् (केरळ) – अल्पसंख्यांकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; मात्र जेव्हा कुणी मंदिरात जातो, टिळा किंवा टिकली लावतो, तेव्हा तो  ‘हिंदुत्वा’च्या मार्गाने जात आहे’, असे म्हटले जाते. हे योग्य नाही. काँग्रेसने अल्पसंख्यांकांसह हिंदूंनाही पक्षासमवेत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतामध्ये बहुसंख्य लोकसंख्या हिंदूंची आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लढाईमध्ये बहुसंख्य समाजालाही घेतले पाहिजे, असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटनी यांनी येथील काँग्रेस कार्यालयात पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात केले. केरळमध्ये काँग्रेसकडून अल्पसंख्यांकांना अधिक महत्त्व देण्याच्या विरोधात अँटनी नेहमीच बोलत आले आहेत.

वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर काँग्रेसने विश्‍लेषण केले होते. हे विश्‍लेषण अँटनी यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. यात म्हटले होते, ‘निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्षता विरुद्ध धर्मांधता यांच्या लढाईचा काँग्रेसवर परिणाम झाला. काँग्रेसला ‘अल्पसंख्यांकप्रेमी’ असे समजले गेले.’

भाजपकडून काँग्रेसवर टीका

डावीकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला

१. अँटनी यांच्या विधानावरून भाजपकडून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्वीट करून म्हटले की, अँटनी यांनी काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणाचा चेहरा उघड केला आहे.

२. आंध्रप्रदेशातील भाजपचे नेते विष्णु वर्धन रेड्डी यांनी ट्वीट करून म्हटले की, यातून हे स्पष्ट होते की, राहुल गांधी स्वतःला जानेवाधारी ब्राह्मण असल्याचा दावा का करत आहेत ?

३. भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट करून म्हटले की, काँग्रेससाठी भारतीय, हे भारतीय नाहीत, तर ते बहुसंख्य आणि अल्पसंख्य; हिंदु आणि मुसलमान, असे विभागलेले आहेत. अँटनी यांच्या विधानातून स्पष्ट होते की, राहुल गांधी मंदिरांच्या चकरा का मारत आहेत ?

संपादकीय भूमिका 

राजकीय लाभासाठी आतापर्यंत मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ करत त्यांना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणार्‍या काँग्रेसला आता पुन्हा सत्तेत येण्याठी हिंदूंची आठवण होऊ लागली आहे, हे लक्षात घेऊन अशा ढोंगी आणि हिंदुद्वेषी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व नष्ट होईपर्यंत हिंदूंनी शांत बसू नये !