केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात ख्रिस्त्यांनी साजरा केला ख्रिसमस !

नृत्य सादर करण्याच्या नावाखाली मंदिरात केला प्रवेश !

श्री पद्मनाभ स्वामी मंदिर

थिरूवनंतपूरम् – शहरातील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात आंध्रप्रदेशातील ख्रिस्त्यांनी मेणबत्त्या पेटवून ख्रिसमस साजरा केला. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील रामचंद्रमूर्ती नामक बाटग्या ख्रिस्त्याच्या नेतृत्वाखालील कुचीपुडी नृत्य सादर करणार्‍या गटाने मंदिरात नृत्याचा कार्यक्रम करण्याची अनुमती मागितली. त्यांनी त्या दिवशी मंदिरात पूजा करण्याचीही अनुमती घेतली होती. केवळ हिंदु नावावरून मंदिराच्या व्यवस्थापकांनी विजयवाडा येथील ख्रिस्त्यांना मंडपाची जागा संमत केली. अनुमती मिळाल्यावर ख्रिस्त्यांनी मंडपात सर्वत्र मेणबत्त्या पेटवल्या आणि नृत्याच्या नावाखाली ख्रिसमस साजरा करणे चालू केले.

१. हे लक्षात येताच मंदिरातील हिंदु भाविकांनी या घटनेचा निषेध केला. त्यानंतर मंदिराच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन मेणबत्त्या विझवल्या. ‘तोपर्यंत मंदिराचे पावित्र्य भंग झाले’, अशी व्यथा भाविकांनी मांडली.

२. श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात मेणबत्त्या लावायला अनुमती नाही. ते निषिद्ध मानण्यात आले आहे. उच्च सुरक्षाव्यवस्था असलेल्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात कडक तपासणीनंतरच भाविकांना प्रवेश दिला जातो.

३. मंदिर प्रशासनाने जाणूनबुजून नियमभंग करण्यास अनुमती दिल्याचा आरोप आहे. ‘मंदिरामध्ये नास्तिकांना नोकरी दिल्याने असे प्रकार घडतात‘, असा आरोप हिंदु भाविकांनी केला. ‘जेव्हा सरकार मंदिरांमधील पूजाविधी आणि परंपरा यांचे संरक्षण करू शकत नाही, ते ते मंदिरांचे व्यवस्थापन स्वतःकडे ठेवण्याविषयी आग्रह का आहे ?’, असा प्रश्‍न भाविकांनी उपस्थित केला आहे.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंच्या मंदिरात घुसून त्याचे पावित्र्य भंग करणार्‍या ख्रिस्त्यांवर कठोर कारवाई करा !
  • पद्मनाभ मंदिराचे सरकारीकरण केल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या !