कोच्ची (केरळ) येथील ‘कार्निव्हल’मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्‍याप्रमाणे बनवण्यात आला पुतळा !

भाजपच्या आरोपानंतर पुतळ्यात पालट करण्याचे आयोजकांचे आश्‍वासन !

(‘कार्निव्हल’ म्हणजे रस्त्यावर नाच-गाणी करत उत्सव साजरा करण्याचा पाश्‍चात्त्य प्रकार)

पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्‍याप्रमाणे बनवण्यात आलेला पुतळा

कोच्ची (केरळ) – येथे कोच्ची कार्निव्हलमध्ये बनवण्यात आलेला पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मिळताजुळता आहे. याद्वारे त्यांचा अवमान करण्यात आला आहे, असा आरापे भाजपचे नेते के.एस्. शैजू यांनी केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्निव्हलच्या ठिकाणी निदर्शनेही केली. त्यांनी ‘कार्निव्हलच्या आयोजकांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे. तसेच पोलिसांत तक्रारही केली आहे. याविरोधानंतर कार्निव्हलच्या आयोजकांनी आश्‍वासन दिले की, या पुतळ्याचे रूप पालटण्यात येईल. (म्हणजे विरोध झाला नसता, तर पुतळ्याचे रूप पालटले नसते, हे लक्षात घ्या ! – संपादक) प्रतिवर्षी येथे कार्निव्हलमध्ये ‘पप्पनजी’ या नावाने पुतळा बनवण्यात येतो. तो ३१ डिसेंबरच्या रात्री जाळला जातो.

संपादकीय भूमिका

साम्यवाद्यांच्या राज्यात असे प्रकार घडल्यास आश्‍चर्य ते काय ? पंतप्रधानांचा चेहरा असलेला पुतळा बनवणे, हे मोदीद्वेषाचे द्योतक आहे !