केरळमध्ये एन्.आय.ए.ने पी.एफ्.आय.च्या ५६ ठिकाणी घातल्या धाडी !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केरळमधील बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना पॉप्युरल फ्रंट ऑफ इंडियाशी (पी.एफ्.आय.शी) संबंधित ५६ ठिकाणी २९ डिसेंबरच्या पहाटे धाडी टाकल्याचे वृत्त ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

पी.एफ्.आय.वर यापूर्वीच केंद्रशासनाने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. बंदी घातल्यानंतर या संघटनेतील दुसर्‍या फळीतील नेते वेगळ्या नावाने पी.एफ्.आय.चे काम करत असल्याच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर या धाडी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.