केरळमध्ये नाताळच्या वेळी २ चर्चमध्ये प्रार्थनेवरून ख्रिस्त्यांच्या गटांत हाणामारी !

कोची (केरळ) – येथे नाताळानिमित्त आयोजित प्रार्थनेच्या वेळी ‘सेंट मेरी कॅथेड्रल बेसिलिका’ या चर्चमध्ये ख्रिस्त्यांच्या २ गटांत हाणामारी झाली. अशाच प्रकारची घटना ‘एर्नाकुलम् कॅथड्रल बेसिलिका’मध्येही घडली.

१. ‘सेंट मेरी कॅथेड्रल बेसिलिका’मध्ये २४ डिसेंबरच्या वेळी ‘होली मास’चे (रविवारी करण्यात येणार्‍या येशूच्या प्रार्थनेचे) समर्थक चर्चच्या आत आले होते, तर दुसरा गट बाहेर होता. या वेळी या गटांत हाणामारी झाली. त्या वेळी येशूला अर्पण करण्यासाठी आणलेले साहित्य विखुरले गेले. या वेळी चर्चची तोडफोड झाल्याचेही सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले.

२. सिरो-मलाबार चर्चच्या अंतर्गत हे चर्च गेल्या काही दशकांपासून ‘मास’च्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहे. मासच्या वेळी काही पाद्री लोकांकडे तोंड करतात, तर काही पाद्री येशूच्या मूर्तीच्या दिशेने तोंड करतात. काही ठिकाणी दोन्ही पद्धतींचे पालन केले जाते. यामुळेच अनेकदा वाद होऊन हाणामारी होते.

संपादकीय भूमिका

 ‘हिंदु धर्मात जाती-जातींत भेदभाव असून त्यांच्यात वाद होतात’, अशी वृत्ते प्रसारित करणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्त्यांमधील गटबाजी आणि त्यामुळे होणारी हाणामारी याकडे मात्र दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !