केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना ‘महनीय व्यक्ती’च्या खोलीत हालवले ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, ‘गोमेकॉ’

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत आता बर्‍याच प्रमाणात सुधारणा होत आहे. त्यांना अतीदक्षता विभागातून आता ‘महनीय व्यक्ती’च्या खोलीत हालवण्यात आले आहे,

आरोग्य कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ

राज्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला २२ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. ही लसीकरणाची मोहीम सलग २ दिवस ७ केंद्रांमध्ये चालणार आहे. प्रतिदिन एका केंद्रात १०० जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर सौम्य ताप, उलटी होणे, ही लक्षणे सर्वसामान्य स्वरूपाची ! – आरोग्य खाते

ही लक्षणे दिसणे म्हणजे ‘लस घेणार्‍याच्या रोगप्रतिकारशक्तीच्या दृष्टीने लस कार्य करू लागली आहे’, असे समजावे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या संचालकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संशयितांना बंदुकीची विक्री करणार्‍या बिहारस्थित दोघांना जामीन संमत

येथील सुवर्णकार स्वप्नील वाळके खून प्रकरणी प्रमुख संशयितांना बंदूक पुरवणारे बिहारस्थित आरोपी शानी कुमार आणि राहुल कुमार यांची येथील सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

आपत्काळात सत्त्वगुणी समाजाच्या रक्षणाचे नेतृत्व प्रथमोपचारक साधकांनी करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘योग: कर्मसु कौशलम् ।’ प्रथमोपचार प्रशिक्षण हा उपक्रम ज्ञान, भक्ती अन् कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम आहे – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पणजी, फोंडा, डिचोली आणि म्हापसा येथील शासकीय अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार अपात्रता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अजून निर्णय नाही ! – राजेश पाटणेकर, सभापती, गोवा विधानसभा

आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने या प्रकरणावर अजून निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी येथे पत्रकारांना दिली.

मराठी भवनावरील आक्रमण खपवून घेणार नाही ! – मराठीप्रेमींची पेडणे येथील बैठकीत चेतावणी

काही मराठीद्वेष्ट्यांनी पर्वरी येथील मराठी भवनावर आक्रमण करून ‘जनमत कौल’ साजरा केला. असा प्रकार पुन्हा घडल्यास तो खपवून घेणार नाही, अशी चेतावणी पेडणे येथे मराठीप्रेमींच्या बैठकीत देण्यात आली.

(म्हणे) ‘ईश्‍वराची निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नाही, याचे स्मरण चित्रपट करून देतात !’ – बंगाली अभिनेत्री ऋतांभरी चक्रवर्ती

व्यक्ती केवळ स्त्री किंवा पुरुष असल्याने श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा सम पातळीवर येत नाही, तर स्वतःच्या कर्माने स्वतःचे स्थान निर्माण करते, हेही न कळणारे अशी वक्तव्ये करतात !