‘ट्रॅफीक सेंटीनल’ योजना रहित, तर नवीन मोटार वाहन कायद्याची कार्यवाही पुन्हा पुढे ढकलली

गोवा मंत्रीमंडळाने नवीन मोटार वाहन कायद्याची कार्यवाही पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे, तर ‘ट्रॅफीक सेंटीनल’ योजना रहित केली आहे. त्याचसमवेत कुक्कुटपालनसंबंधी उत्पादनांच्या आयातीवरील बंदीत वाढ करण्यात आली आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घाला !

वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे.

गोवा बाल न्यायालयात शिक्षा झालेला आरोपी उच्च न्यायालयात निर्दोष

वर्ष २०११ मधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने माजी शिक्षक कन्हैया नाईक यांची निर्दोष सुटका केली आहे.

पाकिस्तानची महिला असल्याच्या संशयावरून महिलेला कळंगुट येथे घेतले कह्यात

गोवा पोलिसांनी पाकिस्तानची नागरिक असल्याच्या संशयावरून २७ वर्षीय एका महिलेला कळंगुट येथे कह्यात घेतले आहे. संबंधित महिला वास्तव्यास असलेल्या परिसरातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

केंद्रीय शासकीय कार्यालयांसाठी म्हापसा परिसरात केंद्रीय सचिवालय उभारणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी अधीक्षक अभियंता आणि प्रधान संचालक यांना केंद्रीय सचिवालय उभारण्यासाठी म्हापसा परिसरात भूमी पहाण्यास सांगितले आहे.

सेरनाभाटी (सालसेत) येथे अनधिकृतरित्या गोवंशियांची हत्या : स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

सेरनाभाटी येथे गोवंशियांची अनधिकृतरित्या हत्या केली जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड घालून ४ संशयितांना कह्यात घेतले आहे.

बंदी असूनही कोलवा परिसरात ‘धिर्यो’(बैलांची झुंज)चे सर्रास आयोजन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘धिर्यो’चे (बैलांची झुंज) आयोजन करण्यास बंदी आहे, तरीही कोलवा परिसरात सर्रासपणे ‘धिर्यो’चे आयोजन केले जात आहे.

‘मार्ग’ चळवळीचे प्रवर्तक गुरुनाथ केळेकर यांचे निधन

गांधीवादी विचारवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, जुन्या काळातील पत्रकार, साहित्यिक आणि गोव्यातील ‘मार्ग’ चळवळीचे प्रवर्तक गुरुनाथ केळेकर यांचे १९ जानेवारी या दिवशी पहाटे निधन झाले.

‘सरफरोश २’ हा चित्रपट ‘सीआरपीएफ्’च्या सैनिकांना समर्पित ! – चित्रपटाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन

‘सरफरोश २’ चित्रपट भारताच्या अंतर्गत सुरक्षेविषयी आहे. विविध समस्या असतांनादेखील भारताची अंतर्गत सुरक्षा किती भक्कम आहे, हे यातून दाखवले जाईल. या समस्या झेलणार्‍या ‘सीआरपीएफ्’च्या सैनिकांना हा चित्रपट समर्पित करत आहे.

मारहाण प्रकरणी रमेश तवडकर निर्दोष

भाजपचे नेते आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांना वर्ष २०१७ मधील मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे.