मडगाव येथील स्वप्नील वाळके खून प्रकरण
मडगाव, २२ जानेवारी (वार्ता.) – येथील सुवर्णकार स्वप्नील वाळके खून प्रकरणी प्रमुख संशयितांना बंदूक पुरवणारे बिहारस्थित आरोपी शानी कुमार आणि राहुल कुमार यांची येथील सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. शानी कुमार आणि राहुल कुमार हे बेगुलसराई, बिहार येथील रहिवासी आहेत. प्रत्येकी २० सहस्र रुपयांच्या हमीवर द्वयींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाच्या अनुमतीशिवाय राज्यातून बाहेर जाण्यास त्यांना न्यायालयाने मनाई केली आहे. स्वप्नील वाळके यांचा दिवसाढवळ्या बंदूकीची गोळी झाडून खून करण्यात आला होता.