बांगलादेशचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांचे त्यागपत्र

बांगलादेशाचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक मासापासून ते सुट्टी काढून परदेशात गेले होते.

बांगलादेशमध्ये २० सहस्र धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या अफवेवरून २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ३० हिंदूंची घरे जाळण्यात आली. तसेच त्यांच्या घरांची लुट करण्यात आली.

रोहिंग्या मुसलमानांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी ४ देशांचे परराष्ट्र मंत्री बांगलादेशमध्ये जाणार !

सहा लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. बांगलादेश आणि म्यानमार सीमेवर त्यांच्या आश्रय छावण्यांची उभारणी झाली आहे. या रोहिंग्यांना सुरक्षा आणि सुविधा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेश सरकार साहाय्य करत आहेत.

बांगलादेश सरकार रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करणार

म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.

बांगलादेश येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना मातृशोक

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे संस्थापक तथा बांगलादेशमधील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या मातोश्री छपाला बाला घोष (वय ९३ वर्षे) यांचे २६ ऑक्टोबर २०१७ या दिवशी त्यांच्या चित्तगांव, बांगलादेश येथील निवासस्थानी निधन झाले.

रोहिंग्या मुसलमान परत म्यानमारमध्ये गेल्यावर स्थिती सामान्य होईल ! – सुषमा स्वराज

भारत म्यानमारच्या राखिन प्रांतातील हिंसेच्या संदर्भात चिंतेत आहे. शरणार्थी म्हणून राहिलेले रोहिंग्या मुसलमान पुन्हा म्यानमारमध्ये गेल्यानंतर येथील स्थिती सामान्य होईल, असे प्रतिपादन भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केले.

बांगलादेशमध्ये आतापर्यंत ५ लाख ८२ सहस्र रोहिंग्या मुसलमान आश्रित

संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार २५ ऑगस्टपासून आतापर्यंत ५ लाख ८२ सहस्र रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे.

चित्तगाँग (बांगलादेश) येथे धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बांगलादेशच्या चितगाँग जिल्ह्यातील चंदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुसलमान तरुणांनी एका १७ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला अज्ञातस्थळी नेले. मुलीला मुसलमान तरुणांनी पळवून नेल्याचे कळताच मुलीच्या पालकांनी चंदगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएन्पी) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलिसांकडूनच धमकी

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु कुटुंबांवर होणार्‍या अत्याचाराला सतत वाचा फोडणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना चित्तगाँग शहर पोलीस आयुक्त महंमद इक्बाल बाहर यांनी धमकी दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now