Bangladesh Durga Puja Idol Vandalised : बांगलादेशात श्री दुर्गापूजेसाठी बनवलेल्‍या मूर्तीची तोडफोड : जाळण्‍याचाही प्रयत्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका – बांगलादेशामध्‍ये श्री दुर्गापूजेसाठी बनवण्‍यात येत असलेल्‍या मूर्तीची तोडफोड केल्‍याची घटना समोर आली आहे. मेघालय सीमेला लागून असलेल्‍या बांगलादेशातील शेरपूर जिल्‍ह्यातील एका मंदिरात ३१ ऑगस्‍टच्‍या रात्री काही धर्मांधांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मूर्तीची तोडफोड केली.

१. मंदिर समितीचे सरचिटणीस सागर रविदास यांनी सांगितले की, काही धर्मांधांनी मंदिराचे कुलूप आणि साखळी तोडून आत प्रवेश केला. त्‍यांनी मंदिरातील देवीची मूर्ती फोडली.

२. त्‍यानंतर पेट्रोल शिंपडून मूर्ती जाळण्‍याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच स्‍थानिक पोलीस आणि सैन्‍यदलाचे जवान घटनास्‍थळी पोचले. स्‍थानिक पोलीस ठाण्‍याचे  प्रमुख कय्‍युम खान सिद्दिकी यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केल्‍यानंतर आक्रमणकर्त्‍यांवर कारवाई केली जाईल.

३. बांगलादेशात नवीन सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर हिंदूंमध्‍ये भीतीचे वातावरण आहे; मात्र, सरकारने हिंदूंच्‍या सुरक्षेविषयी आश्‍वासन दिले आहे.

संपादकीय भूमिका

भारताने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी काहीही केले नाही, तर भविष्‍यात बांगलादेशात हिंदू आणि त्‍यांची मंदिरे शिल्लक रहाणार नाहीत, हेच यातून दिसून येते !