बांगलादेशमध्ये आतापर्यंत ५ लाख ८२ सहस्र रोहिंग्या मुसलमान आश्रित

संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार २५ ऑगस्टपासून आतापर्यंत ५ लाख ८२ सहस्र रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे.

चित्तगाँग (बांगलादेश) येथे धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बांगलादेशच्या चितगाँग जिल्ह्यातील चंदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुसलमान तरुणांनी एका १७ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला अज्ञातस्थळी नेले. मुलीला मुसलमान तरुणांनी पळवून नेल्याचे कळताच मुलीच्या पालकांनी चंदगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएन्पी) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलिसांकडूनच धमकी

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु कुटुंबांवर होणार्‍या अत्याचाराला सतत वाचा फोडणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना चित्तगाँग शहर पोलीस आयुक्त महंमद इक्बाल बाहर यांनी धमकी दिली.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

बांगलादेशच्या ठाकुरगाव जिल्ह्यातील रुहिया आखणगड क्षेत्रात एका हिंदु अल्पवयीन शाळकरी मुलीवर ५ धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.

बांगलादेशमध्ये शरणार्थी म्हणून रहाणार्‍या २२ रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांना अटक

म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांच्या अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या २२ आतंकवाद्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली. ते येथे शरणार्थी म्हणून रहात होते.

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्‍नावरून शेजारी देश युद्धजन्य स्थिती निर्माण करत आहे ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्‍नावरून शेजारी देश युद्धजन्य स्थिती निर्माण करत आहे; मात्र आम्ही संयम राखून संघर्ष टाळलेला आहे, असे प्रतिपादन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे. त्यांनी म्यानमारधील हिंसाचाराला वंशसंहार असे म्हटले आहे.

रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे ! – बांगलादेश

रोहिंग्या मुसलमान ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी केले. बांगलादेशात थांबणे हा रोहिंग्यांपुढचा पर्याय असू शकत नाही. रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे, असेही हक यांनी म्हटले आहे.

बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यात हिंदुमुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यातील सोनातोला उपजिल्ह्यात काही धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला अज्ञात स्थळी नेले.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी अपहरण करून धर्मांतर केलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या प्रयत्नामुळे सुटका

बांगलादेशच्या किशोरगंज जिल्ह्यातील कोटियाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ धर्मांधांनी एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे नुकतेच अपहरण केले आणि तिचे बळजोरीने इस्लाममध्ये धर्मांतर केले.


Multi Language |Offline reading | PDF