|
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक) |
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे थांबण्याचे नाव घेत नाही. तेथील हिंदूंनी यासंदर्भात नव्याने झालेल्या हिंसाचाराची माहिती ‘सनातन प्रभात’ला कळवली. एका घटनेत महंमद रियाझुल इस्लाम या जिहाद्याने ३१ ऑगस्टच्या सायंकाळी ५ वाजता लालमोनिरहाट जिल्ह्यात असलेल्या अदिथमारी उपजिल्ह्यातील मंदिरांना लक्ष्य केले. या वेळी त्याने श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची विटंबना करून त्या तोडल्या. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांसाठी लढणार्या संघटनेचे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर इस्लामला अटक करण्यात आली.
🚨Bangladesh: The wave of violence against Hindus continues.
J!h@d! Mu$|!m$ desecrate idols in temples.
Many Hindu homes set on fire.
🚨📢🔔⚠️ In India, if anything happens against Mu$|!m$, even by mistake, the entire anti-Hindu machinery raises an uproar.
Foreign media,… pic.twitter.com/Z8467kjQ9a
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 1, 2024
लवकरच चालू होणार्या श्री दुर्गापूजा उत्सवाच्या निमित्ताने शेरपूर जिल्ह्यातील श्रीबोर्डी गावात श्री दुर्गादेवीच्या नव्या मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. काही जिहाद्यांनी त्या मूर्तींना लक्ष्य करून त्यांची विटंबना केली. पू. (अधिवक्ता) घोष यांनी स्थानिक पोलीस अधीक्षक अक्रमुल होसेन यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
Hindus are still being targeted in #Bangladesh.
The grocery shop of a Hindu named Gautam Chakravarti was attacked, vandalized, looted in the city of Comilla recently. Items of about 1.5 lac and Rs. 50,000 were looted from the shop.
It’s a M dominated area. None of the M… pic.twitter.com/iP7LCBybMc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2024
ठाकूरगाव जिल्ह्यात अनेक हिंदूंच्या घरांची लूट करून जाळपोळ !
१. येथील पीरगंज उपजिल्ह्यातील गारगाव नावाच्या गावात धर्मांध मुसलमानांनी गोपाळ रॉय नावाच्या हिंदूच्या घराला लुटले आणि घराला आग लावली. ही घटना ३० ऑगस्टला घडली.
२. अन्य एका घटनेत जिल्ह्यातील नापितपाडा येथे दुलाल शर्मा यांचे घर जाळले. २८ ऑगस्टला झालेल्या या घटनेनंतर शर्मा यांनी पलायन केल्याचे समजते.
३. बाशमली पाडा, लक्षीरहाट येथे खोका बाबू यांचे घर आगीच्या हवाले करण्यात आले.
४. ३० ऑगस्टच्या मध्यरात्री ढोलाहाट क्षेत्रातील माणिक मास्तर यांचे घर जाळण्यात आले.
#Bangladesh: Hindu house set on fire on Friday, August 30th.
Attacks on Hindus continue relentlessly in Bangladesh while the international community chooses to remain completely oblivious to it.
On Friday, the 30th of August, 2024, the house belonging to Gopal Roy in Gargaon… pic.twitter.com/kkK3JUvpC2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 1, 2024
बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठांच्या भ्रमणभाषांची होत आहे तपासणी !एका हिंदुत्वनिष्ठाशी बोलण्यासाठी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्याला संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. काही घंट्यांनी त्या हिंदुत्वनिष्ठाने व्हॉट्सअॅपद्वारे ऑडिओ पाठवला. त्यात त्याने सांगितले की, तुम्हाला ठाऊकच आहे की, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती किती दयनीय आहे !
आम्हा हिंदुत्वनिष्ठांचे भ्रमणभाष तपासले जात आहेत. त्यामुळे आम्ही कामासाठी बाहेर पडतांना आमचे भ्रमणभाष घरीच ठेवून येतो. आम्ही तुमच्याशी रात्री ११ नंतरच संपर्क साधू शकतो. आमची स्थिती अत्यंत वाईट आहे ! |
संपादकीय भूमिका
|