Bangladesh riot : वर्ष १९७१ नंतर प्रथमच बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती झाली बिकट !

  • बांगलादेशातील एका हिंदुत्‍वनिष्‍ठाने ‘सनातन प्रभात’ला कळवली माहिती

  • अत्‍याचारांच्‍या विरोधात न्‍यायालयातही प्रविष्‍ट करू शकत नाहीत याचिका !

बांगलादेशातील दंगलीचे संग्रिहत छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – भारतासमवेत असलेल्‍या बांगलादेशाच्‍या सीमा भारताने बंद केल्‍या आहेत. बांगलादेशी सैन्‍य लवकरच एक मोहीम (ऑपरेशन) चालू करणार असून या माध्‍यमातून हिंदूंना मारण्‍याचे षड्‍यंत्र आखण्‍यात आले आहे. वर्ष १९७१ नंतर प्रथमच हिंदूंची एवढी वाईट स्‍थिती निर्माण झाली आहे. आमच्‍यावर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या विरुद्ध न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍याचा विचार केला, तरी तेथेही ‘जमात-ए-इस्‍लामी’चे जिहादी कार्यकर्ते असतात. त्‍यामुळे आम्‍हाला न्‍यायालयाची पायरी चढणेही अशक्‍यप्राय झाले आहे, अशी व्‍यथा बांगलादेशातील एका हिंदुत्‍वनिष्‍ठाने ‘सनातन प्रभात’ला दूरभाषद्वारे कळवली आहे.

हिंदुत्‍वनिष्‍ठाने मांडलेली बांगलादेशातील भयानक स्‍थिती !

१. हिंदुत्‍वनिष्‍ठांवर प्रचंड दबाव !

जे हिंदुत्‍वनिष्‍ठ लव्‍ह जिहाद आणि लँड जिहाद यांच्‍या विरुद्ध कार्य करत आहेत, ते येथील सरकार अन् जिहादी मुसलमान यांच्‍या लक्ष्यावर (‘हिट लिस्‍ट’वर) आहेत. अशाच एका मोठ्या हिंदुत्‍वनिष्‍ठाला काही दिवसांपूर्वी आमच्‍या सैन्‍याधिकार्‍यांनी बोलावून तंबी दिली आणि हिंदुत्‍वासाठी काही न करण्‍यासाठी दबाव आणला. हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या प्रत्‍येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

२. बांगलादेशाच्‍या अंतिरम सरकारचे प्रमुख डॉ. महंमद युनूस यांना हिंदू अजिबात आवडत नाहीत !

सध्‍या सरकारमध्‍ये आसिफ नाझरूल आदी काही नेते असे आहेत, जे अत्‍यंत कट्टर असून त्‍यांनी मदरशात शिक्षण घेतले आहे. सध्‍याच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख असलेले डॉ. महंमद युनूस हे अमेरिकेचे हस्‍तक असून त्‍यांना हिंदू अजिबात आवडत नाहीत.

३. उत्तर बांगलादेशात ‘जमात-ए-इस्‍लामी’चे जाळे वाढत आहे !

हिंदूंची संख्या अधिक असलेल्‍या उत्तर बांगलादेशात ‘जमात-ए-इस्‍लामी’ स्‍वत:चे जाळे वाढवत आहे. ५ ऑगस्‍टला शेख हसीना यांनी पदत्‍याग आणि पलायन केल्‍यानंतर अवघ्‍या २ दिवसांतच जमात-ए-इस्‍लामीच्‍या जिहाद्यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनात घुसून ढाक्‍यातील कारागृहांतून कुख्‍यात आतंकवाद्यांना सोडवले. त्‍या काळात पोलीसही हतबल झाले होते. त्‍यांच्‍यावरही आक्रमणे चालू होती.

संपादकीय भूमिका

भारतातील हिंदूंनो, बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार यशस्‍वी झाला, तर पुढील क्रमांक भारताचाच आहे, हे लक्षात घ्‍या ! आताच जागृत व्‍हा आणि  प्रत्‍येक मतदारसंघात सहस्रावधींच्‍या संख्‍येने एकत्र येऊन तेथील आमदार आणि खासदार यांना भेटा ! त्यांना बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षिततेसाठी काहीतरी ठोस कृती करण्‍याचा भारत सरकारवर दबाव आणण्‍यास सांगा !