बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या आक्रमणांच्या विरोधात लिखाण केल्याने फेसबूककडून माझे खाते ७ दिवसांसाठी बंद ! – लेखिका तस्लिमा नसरीन

हिंदूंनी फेसबूकचा निषेध करून तस्लिमा नसरीन यांचे खात पुन्हा चालू करण्यासाठी त्याच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !

(म्हणे) ‘बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांत मंदिरांची तोडफोड आणि बलात्काराच्या घटना झाल्याच नाहीत !’ – बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री

बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ६८३ जणांना अटक !

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारताने बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसाचाराच्या प्रकरणी आणखी एका सूत्रधाराला अटक

रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ह्यात १७ ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार असलेला शैकत मंडल आणि त्याचा साथीदार या दोघांना ढाक्याच्या सीमेवरील गाझीपूर येथून अटक करण्यात आली.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ ‘इस्कॉन’कडून १५० देशांतील ७०० मंदिरांजवळ आंदोलने !

ट्विटरवरील #SaveBangladeshiHindus हा हॅशटॅग ट्रेंड जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकावर !

बांगलादेशमध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीवर झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

बांगलादेशातील निर्वासित रोहिंग्यांच्या छावणीवर अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला. उखिया येथील कॅम्प क्रमांक १८ च्या ब्लॉक एच्-५२ मधील मदरशावर अज्ञात व्यक्तींनी पहाटे ४ वाजता आक्रमण केले.

वर्ष २०५० मध्ये बांगलादेशात हिंदूच नसतील ! – बांगलादेशी लेखकाच्या पुस्तकात दावा

भारतातील अल्पसंख्यांकांवर कथित अन्याय झाल्यावर आकाश-पाताळ एक करणार्‍या मानवाधिकार संघटना बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंंचे समूळ उच्चाटन होत असतांना चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

शेख हसीना यांनी वर्ष २०१६ मध्ये हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांच्या सूत्रधाराला निवडणुकीत दिली होती उमेदवारी ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

हसीना यांच्या हिंदुद्वेषी राजवटीत हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे. हे पहाता आता भारताने पुढाकार घेऊन कठोर पाऊल उचलणे आवश्यक ठरले आहे !

बांगलादेशमध्ये गेल्या ४० वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येत ५ टक्के घट !

गेल्या ४ दशकांत याकडे लक्ष न देणार्‍या भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! आता तरी सरकार बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करणार का ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन असल्याचे उघड !

हिंदूंवर आक्रमण करण्यासाठीच अशा प्रकारचे कट धर्मांधांकडून रचले जात आहेत, हे लक्षात घेऊन हिंदूंना आता अधिक सतर्क रहाण्याची आणि त्यांच्यावर होणारी आक्रमणे परतवून लावण्याची आवश्यकता आहे !