बांगलादेशात दंगलखोरांनी रेल्वेगाडीला लावली आग ! : ५ जणांचा मृत्यू

रेल्वेगाडीला लावलेली आग

ढाका (बांगलादेश) – येथील गोपीबाग भागात ५ जानेवारीच्या रात्री दंगलखोरांनी एका रेल्वेगाडीला लावलेल्या आगीमध्ये ५ जणांना मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. यापूर्वी १९ डिसेंबरला एका रेल्वेगाडीला आग लागली होती, त्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशमध्ये १२ व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान होणार आहे.